भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगेंना कोरोनाची बाधा; फडणवीसांच्या दौऱ्यात झाले होते सामील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असताना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत माहिती दिली.

काल रविवारी २८ जूनला आमदार लांडगे यांच्या प्रकृतीमध्ये बदल वाटल्याने त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता आमदार महेश लांडगे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड दौऱ्यात होते सामील
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे मतदारसंघात जाऊन अनेकदा परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच, गेल्याच आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी आमदार महेश लांडगे देखील तिथे उपस्थित होते. शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment