‘अब बेबी पेंग्विन तो गयो’.. सुशांत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नितेश राणेंचं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या निकालानंतर ट्विट करत भाजपा आमदार नितेश राणेंनी ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ असं म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधतेवेळी राणे यांनी थेट शब्दांत यावर आपली प्रतिक्रिया दिली.

‘या निर्णयासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयानं देशाची, सुशांतच्या कुटुंबीय आणि चाहत्यांची भावना लक्षात घेत त्या भावनेचा आदर करत निर्णय दिला आहे. मला विश्वास आहे जी लवपालवपी होत होती, सुशांतच्या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते त्याला चाप बसेल. तेव्हाच सुशांतला न्यायही मिळेल’, असं राणे म्हणाले. “सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही थेट घेतलं नाही. तरीसुद्धा त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं. त्यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं याबद्दल चौकशी झाली पाहिजे.” असंही नितेश राणेंनी म्हटलं.

याशिवाय नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या नावही वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर राणेंनी हे ट्विट केल्याचं स्पष्ट होत आहे. याच धर्तीवर राजकारण आम्ही करतो, की ठाकरे सरकार हे महाराष्ट्र आणि देशानं पाहिलं आहे असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment