सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने आत्मपरीक्षण करावं, तर राऊतांनी तोंड बंद ठेवावं; राणेंचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह ( Sushant Singh Rajput ) प्रकरणावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी (narayan rane) राज्य सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने आता तरी आत्मपरीक्षण करावं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाणं ही संपूर्ण भारतीयांची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देऊन संपूर्ण भारतीयांच्या इच्छेचा आदरच केला आहे, असं सांगतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता तरी त्यांची जबान बंद ठेवावी, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले कि, ‘न्यायालय राज्यातील प्रकरणे सीबीआयकडेच का देतात? सरकारवर ही वेळ का आली? याचं राज्य सरकारने आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला. राज्यातील सरकार हे जनतेसाठी नाही. हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचं आजच्या निर्णयातून सिद्ध झालं आहे, असंही राणे यांनी सांगितलं.

राज्यातील पोलिसांनी त्यांची आनबान शान ठेवली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच योग्य पद्धतीने तपास करायला हवा, असं सांगतानाच सुशांतप्रकरणात पार्टीतील लोकांवर अजूनही कारवाई नाही. अटक नाही. एफआयआर नोंदवला नाही. त्यामुळे कोर्टाचा निर्णय सरकारच्या विरोधात जाणार हे दिसत होतं. हे प्रकरण संशयास्पदरित्या हाताळल्या जात होतं, असंही ते म्हणाले. आता या प्रकरणात राज्य सरकारने पुन्हा आव्हान दिलं तरी काही फरक पडणार नाही. आता मुंबई पोलिसांच्या विरोधात गोळी सुटली आहे. त्याला इलाज नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment