स्वत:च्याच सरकारने बंदी घातलेले चिनी ऍप भाजप राजरोस वापरते; काँग्रेसचा पुराव्यासकट हल्लाबोल

मुंबई । गलवान खोऱ्यातील चीनच्या घुसखोरीचा निषेध म्हणून केंद्र सरकारने बंदी घातलेले ऍप भारतीय जनता पक्ष राजरोस वापरत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून त्याचे पुरावेच दिले आहेत. भाजपने ‘CamScanner’ या चिनी ऍपचा वापर करून भाजपनं आपल्या पक्षांतर्गत नियुक्त्यांचं एक पत्रक स्कॅन केल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. ते पत्रकही सावंत यांनी शेअर केलं आहे. तसंच, भाजपला गद्दार ठरवत जाहीर निषेधही केला आहे.

याशिवाय पंतप्रधान मोदींनी चायनीज ऍप CamScanner भारतात बॅन केल्यानंतरही भाजपकडून याचा वापर केला जात असल्याची बाब अतिशय निंदनीय असल्याचं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. पंतप्रधानांनी चीनचं CamScanner ऍप संपूर्ण भारतात बंद केलं होतं की केवळ सामान्य जनतेसाठी बंद केलं होतं, असा सवाल काँग्रेसकडून केला जात आहे. भाजप भारताचा भाग नाही का? की केवळ भाजपसाठी विशेष सवलत दिली आहे? असा खोचक प्रश्नही काँग्रेसकडून विचारला जात आहे.

महाराष्ट्र यूथ काँग्रेसकडून, भाजपचं एक प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आलं आहे. त्या प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी कॅम स्कॅनर ऍपचा वापर केल्याचं दिसत आहे. यावरुन सचिन सावंत यांनी भाजपला चायनीज ऍप बॅन करण्याची कृती म्हणजे केवळ दिखावा केल्याचा टोला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com