BSNLचे कर्मचारी देशद्रोही असून ८८ हजार जणांना घरी पाठवणार; भाजपाचे खासदाराची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कन्नड । आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “BSNLचे कर्मचारी हे गद्दार आहेत आणि ते कंपनीला पुढे नेण्यासाठी काम करू इच्छित नाहीत,” असं वक्तव्य हेगडे यांनी केलं आहे. याशिवाय कंपनीच्या खासगीकरणानंतर ८८ हजार कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याची धमकीही हेगडे यांनी दिली आहे.एएनआयनं याबाबतचे वृत्त दिलं आहे.

उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमथा एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलतांना हेगडे म्हणाले, ”बीएसएनएलचे कर्मचारी गद्दार आहेत. तसंच ते आपल्या कंपनीच्या विकासासाठी काम करण्यास इच्छुक नाही. सरकार बीएसएनएलचं खासगीकरण करणार आहे. त्यामुळे ८८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ”

ते पुढे म्हणाले कि, “सरकारनं कामासाठी निधी दिला आहे. लोकांचा सेवेची आवश्यकता आहे आणि पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. परंतु ते काम करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. त्यांनी निधी आणि तंत्रज्ञानही दिलं आहे. परंतु बीएसएनएलचे कर्मचारी काम करण्यास इच्छुक नाहीत,” असंही ते म्हणाले. यापूर्वी हेगडे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहे. त्यामुळे अनेकदा ते चर्चेतही आले होते. नुकतंच हेगडे यांनी महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मोठा वाद उफाळला होता. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न हे नाटक असल्याचं म्हटलं होतं

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment