सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या दिड महिन्यापासून अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकणाचा तपास सुरु असतानाही त्याप्रकरणी हाती आलेल्या अपयशावर भाजप नेते नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिदषेमध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणासोबतच त्याची एक्स मॅऩेजर दिशा सॅलिअन हिच्या मृत्यूबाबतही धक्कादायक खुलासा केला. दिशा सॅलिअन हिची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचं म्हणत तिच्यावर बलात्कार झाल्याचा खळबळजनक दावा राणेंनी केला. काही अहवालांचा संदर्भ देत त्यांनी ही बाब माध्यमांपुढे मांडली.

‘दिशा सॅलियन हिनं आत्महत्या केली नाही, तर ही हत्या आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी का केली नाही. बलात्कार करून दिशाची हत्या करण्यात आली कारण तिच्या गुप्तांगांवर जखमा असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळं याकडे का दुर्लक्ष केलं गेलं’?, या शब्दांत राणेंनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजीचा सूर आळवला. हे सरकार गुन्हेगारांना वाचविण्यासाठी आहे असा सूर आळवत त्यांनी निरपराध मुलींवर अत्याचार करून खून करण्याचे लायसन सरकारला दिलेले नाही म्हणत त्यांनी टीका केली.

याशिवाय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, असा दावानारायण राणे यांनी केला. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. याप्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली. मात्र मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नाही. ‘गेल्या ५० दिवसांत मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध का लावला नाही,’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला. या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचीही टीका त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment