हिंमत असेल तर एकएकटे लढा ; भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचे महाविकास आघाडीला आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीला केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण नागपूर आणि पुणे पदवीधर हे भाजपचे हक्काचे असणारे मतदारसंघ या निवडणुकीत त्यांच्या हातून निसटताना पाहायला मिळत आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा दणदणीत विजय झाला आहे तर नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयी आघाडी घेतली आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या बलाढ्य ताकदीपुढे भाजपचे आव्हान फिक पडत असल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीची एकी भाजपला जड जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराना पराभवाचे तोंड पाहावं लागत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment