उद्धव ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी ; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटकावले पाचवे स्थान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान पटकावले आहेत. या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अतिशय चांगल काम केल्याची ही पोचपावतीच म्हणायला  पाहिजे. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’या  सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४ टक्के मतं मिळाली आहेत.ते प्रथम क्रमांकावर आहेत.

पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मते मिळाली आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र १५ टक्के मते मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ टक्के  मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे-

योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) २४%
अरविंद केजरीवाल (दिल्ली) १५%
जगन रेड्डी (आंध्र प्रेदश) ११%
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) ९%
उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) ७%

Leave a Comment