कानपूर चकमकीप्रकरणी प्रियंका गांधींनी योगी आदित्यनाथांना सुनावले खडे बोल, म्हणाल्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । कानपूर चकमकीप्रकरणी विरोधकांनी योगी सरकारला चांगलेच घेरले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप काँगेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशात गुंडांनी केलेल्या गोळीबारात ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. उत्तर प्रदेशातील कायदा आण आणु सुव्यवस्था खालावली आहे. गुन्हेगारांची भीती संपली आहे. “सर्वसामान्य जनता आणि पोलीसदेखील सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. इतक्या गंभीर घटनेनंतर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये अजिबात हलगर्जीपणा नको,” असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

उत्तरप्रदेशातील कानपूर येथे पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत उपअधीक्षकासह ८ पोलीस मारले गेलेत. कानपूरच्या बिकरू गावात गुंड विकास दुबे याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी झालेल्या चकमकीत एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.” 

Leave a Comment