एकदा विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतरचं केंद्रानं NEET आणि JEE परीक्षेसंबंधी अंतिम निर्णय घ्यावा- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा NEET आणि JEE परीक्षेसंदर्भांत आपलं मत मांडलं आहे. NEET आणि JEE परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका अशी आर्जव विनंतीही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोना संकटाचा सामना कऱण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप केला आहे. सरकारने आपला निर्णय विद्यार्थ्यांवर लादता कामा नये असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने १७ ऑगस्ट रोजी NEET UG 2020 आणि JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगर भाजप ६ राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. JEE (main) परीक्षा १-६ सप्टेंबर तर NEET UG 2020ची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment