‘कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख पार.. कुठं गायब झाली मोदी सरकार’; राहुल गांधींची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला असताना देशातील मोदी सरकार मात्र गायब आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ट्विटरवरून राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

यापूर्वीही त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. १७ ऑगस्टच्या आपल्या ट्विटमध्ये १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोना रूग्णांची संख्या २० लाखांवर पोहचेल असे राहुल गांधींनी म्हटले होते. सरकारने हा संसर्ग रोखण्यासाठी ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती. म्हणूनच आजच्या ट्विटमध्ये त्यांनी आपले ते जुने ट्विट जोडले आहे. काल रात्री म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी करोनाच्या रुग्णसंख्येने देशात २० लाखांचा आकडा पार केला आहे. याचा उल्लेख करत आता रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे आणि मोदी सरकार बेपत्ता आहे, असे म्हटले आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताचा क्रमांक जगात तिसरा
जगात ज्या देशांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment