भाजपने संविधानाला सर्कस, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे- काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राजस्थानमधील सत्तासंघर्ष अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. दरम्यान, भाजप पुरस्कृत काँग्रेस आमदारांच्या घोडेबाजाराच्या मुद्द्यावरून हा संघर्ष विकोपाला जात आहे. या सत्तानाट्यावरून काँग्रेसचे नेते रणदीप सिग सुरजेवाला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपावर हल्लाबोल केला. “भाजपानं संविधानाची सर्कस केली असून लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झालं होतं तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपाच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल,” असं सुरजेवाला म्हणाले.

“जेव्हा काँग्रेसकडे बहुमत आहे, सभागृहदेखील भरवायचं आहे, तसंच हा अधिकार सरकारचा आहे तेव्हा भाजपावाले आणि त्यांचे अनुयायी का पाठ दाखवून पळून जात आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे?,” असा परखड सवालही सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे भाजपाला केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment