काँग्रेस कार्यकर्त्याची अशीही पक्षनिष्ठा; मुलाचे नाव ठेवलं काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । प्रामाणिकता, पक्षनिष्ठा, नीतिमत्ता ह्या गोष्टी राजकारणातून हद्दपार झाल्या आहेत असं बरेचदा राजकीय नेत्याकडून ऐकायला मिळत. मात्र, आजही राजकीय पक्षासाठी झटणाऱ्या कर्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षा प्रती आस्था, प्रेम कायम असल्याचं उदाहरण राजस्थानमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिल आहे. राजस्थानमधील विनोद जैन या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. त्यामुळे सर्वत्र या काँग्रेस कार्यकर्त्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे त्याने थेट पक्षाचे नाव आपल्याला मुलाला दिलं असं विनोदचं म्हणणं आहे.

मागच्या वर्षी १८ जुलै रोजी विनोदला मुलगा झाला होता. त्याने त्यांच्या मुलाचं नाव काँग्रेस जैन असं ठेवलं आहे. नुकतेच त्याने आपल्या मुलाचे बर्थ सर्टिफिकेट काढले यावरही त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. मुलाचं नाव काँग्रेस ठेवल्याने त्याच्या कुटुंबीयानी आणि मित्रांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण विनोदने आपल्या निर्णयावर ठाम राहत मुलाचं नाव काँग्रेसच ठेवलं.

“माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा संपूर्ण देशात तो काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असेल”, असं विनोद जैनने सांगितले. विनोद राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची प्रेरणा घेऊन काँग्रेसमध्ये काम करत आहेत. विनोदने एनएसयूआयचे जिल्हा महासचिव पदावरुन आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली होती. आज अशोक गहलोत यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या टीमचा विनोद सदस्य आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मोदी आर्थिक सुधारणांकडे लक्ष देतील?

‘या’ कारणामुळं इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजार शनिवारी सुरु राहणार

”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

Leave a Comment