६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिन, म्हणून दिवे लावायचं आवाहन केलं का?- कुमारस्वामी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या कल्पनेवर समाजवादी जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शंका उपस्थित केली आहे. कुमारस्वामी यांनी ट्विट करून काही प्रश्नही मोदींना विचारले आहेत.

”पंतप्रधानांनी धूर्तपणे देशाला भाजपाच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन केलं आहे का? ६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिन आहे, त्यामुळे या कार्यक्रमासाठी तारीख आणि वेळ का निवडली हे सांगू शकतील का? मी पंतप्रधानांना आव्हान देतो, दिवा वा मेणबत्ती लावण्यामागे एक वैज्ञानिक अथवा तर्कावर आधारित कारण त्यांनी सांगाव,” आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून कुमारस्वामींनी मोदींवर ही टीका केली आहे.

”राष्ट्रीय आपत्तीला ईव्हेंट स्वरूप देण हे खूप लज्जास्पद आहे. त्यापेक्षाही जास्त अपमानास्पद बाब म्हणजे जागतिक आपत्ती ओढवलेली असताना त्याआडून स्वतःच्या पक्षाचा अजेंडा राबवणं. पंतप्रधान हे समजून घेतील,” असा घणाघात कुमारस्वामी यांनी मोदींवर केला. ”अजूनही डॉक्टरांना पीपीई (स्वसंरक्षण साधनं) दिलेली नाहीत. दुसरीकडे नागरिकांच्या तपासणी करण्यासाठी स्वस्त किट उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. करोनाला रोखण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आहेत. हे सांगण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच त्रासून गेलेल्या जनतेला अर्थहीन काम करायला सांगत आहेत,” अशी प्रखर टीका कुमारस्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment