दिल्लीत जे घडलं त्याला वृत्तवाहिन्यांनी सांप्रदायिक रंग दिला- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दिल्लीतही महाराष्ट्राप्रमाणे मरकजचा धार्मिक मेळाव्याला परवानगी नाकारून खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचं वारंवारं वेगळ चित्रं निर्माण केलं गेलं नसतं. एखाद्या वर्गाचं असं चित्रं निर्माण करून त्यात सांप्रदायिक भर घालण्याची संधी वृत्तवाहिन्यांना मिळाली नसती, असं सांगतानाच दिल्लीत जे घडलं ते रोज दाखवण्याची गरज आहे का? त्यातून आपण कोणती परिस्थिती निर्माण करू पाहतोय, याचा विचार वृत्तवाहिन्यांनी करण्याची गरज आहे, असं परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना पवार यांनी वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवलं. सोलापुरात एका गावी बैल गाडी शर्यत पार पडली. अशा सोहळा करायची गरज नव्हती. पण आनंद आहे की पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तो प्रकार तिथेच थांबला. तशी तत्परता दिल्लीत दाखवली असती तर आज जे पहायला मिळातंय ते पुन्हा पुन्हा पहायला मिळालं नसतं, असंही पवार यांनी म्हटलं.

पवार यांनी यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवरही चिंता व्यक्त केली. सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत एकत्र राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत कटुता, संशय वाढेल अशी स्थिती निर्माण होऊ न देण्याची गरज आहे. मी टीव्हीवर जे काही पाहतो व्हॉट्सअपवर येणारे मेसेज चिंता निर्माण करणारे आहेत. काही मेसेजची तपासण केल्यानंतर लक्षात आलं की, पाच पैकी चार मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आणि वास्तव पुढं आलं तर वारंवार त्याची मांडणी करुन त्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज निर्माण केला जात आहे. हे कुणी मुद्दामून करत आहे का याबद्दल शंका वाटते,” असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment