कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात क्रमांक दोन वर; गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीची स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास सरकारचे प्रयत्न आता तोडके ठरत असल्याचे चित्र आहे. कारण सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांच्या यादीत भारत ब्राझीलला देखील मागे टाकत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे.देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येन आता ४२ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे.

मागील २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२ लाख ४ हजार ६१४ वर पोहचली आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाचे ७५ ते ८० हजार रुग्ण आढळत होते. मात्र, आता तब्बल ९० हजार कोरोना रुग्ण आढळल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

देशातील एकूण ४२ लाख ४ हजार ६१४ करोनाबाधितांमध्ये ८ लाख ८२ हजार ५४२ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज देण्यात आलेले ३२ लाख ५० हजार ४२९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७१ हजार ६४२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment