‘उद्धव ठाकरेजी मी आहे तुमच्या सोबत’; अरविंद केजरीवालांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राती जनतेला पाठिंबा दर्शवला आहे. या संकटाच्या काळात आपण मुख्यमंत्री ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहोत असे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘प्रिय उद्धव ठाकरेजी, दिल्लीच्या जनतेच्या वतीने मी निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आपल्या आणि महाराष्ट्रातील जनतेसमवेत उभा आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रार्थना करीत आहोत.’

अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच क्रिकेटपटू सुरेश रैना यांनीही निसर्ग चक्रीवादळाविषयी ट्विट केले आहे. सर्वांनी आपापल्या घरातच राहावे आणि प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीच्या उपायांचे आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रैनाने केले. दरम्यान, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळाने मुंबईच्या किनारपट्टी भागात जोरदार धडक दिली. यावेळी मुंबईत जोरदार वारा, पाऊस सुरू झाला आहे. समुद्रात उंच लाटा वाढत आहेत. मुंबईच्या अनेक भागात झाडे कोसळली आहेत, त्यामुळे वीज गेली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी घरांची छप्परे उडण्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले व रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान करणारे निसर्ग वादळ आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकल्याची माहिती आहे. असं असलं तरी मुंबईचा धोका अद्याप कमी झालेला नाही. वादळानं दिशा बदलल्यानं मुंबईत वाऱ्या-पावसाचा जोर कमी झाला आहे. तर, नाशिकमध्ये पाऊस सुरू झाला आहे. हे वादळ पुढे कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करणार, याकडं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment