दिल्लीत केजरीवाल सरकार रेशनची होम डिलीव्हरी करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।  दिल्लीच्या केजरीवाल सरकारने ‘घरघर रेशन’ योजनेस मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली. ही योजना झाल्यानंतर लोकांना रेशन दुकानांवर जावे लागणार नाही. गरीबांना घरापर्यंत रेशन पोहोचवण्याचा निर्णय झालाय. दिल्लीत दरमहा साधारण ७२ लाख जणांना रेशनची सुविधा मिळते. या पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारही असा निर्णय घेईल का असा प्रश्न उपस्थित होतोयं.

ही योजना सुरु झाल्यानंतर रेशन थेट लोकांच्या घरी पाठवलं जाईल. त्यांना रेशन दुकानावर येण्याची गरज नसेल. हे एक क्रांतिकारक पाऊल आहे. गरिबांना सन्मानाने रेशन मिळावं अशी माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती, जी आज पुर्ण झाल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. ज्या दिवशी दिल्लीत मुख्यमंत्री घर-घर रेशन योजना सुरु होईल त्याच दिवशी दिल्लीत केंद्र सरकारची वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू केली जाईल असेही ते म्हणाले. दुकानामध्ये जाऊन रेशन घ्यायचं की घरामध्ये रेशन मिळावं हे पर्याय दिल्लीकरांसमोर असणार आहेत. होम डिलीव्हरी अंतर्गत गहूच्या ऐवजी पीठ दिले जाईल. ६ ते ७ महिन्यात ही योजना सुरु होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment