मोदींनी हॉस्पिटलला भेट दिली की नाही? लष्कराने केला खुलासा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी लेह लडाख मध्ये गेले होते. सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. तुमच्या शौर्याची जाण संपूर्ण देशाला आहे हा विश्वासही त्यांना आपल्या शब्दांमधून दिला. इतकंच नाही तर गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यांचे हे फोटो प्रसारित झाल्यावर सोशल मीडियावर हे फोटो संपादित असल्याचा दावा करण्यात येऊ लागला आहे यावर भारतीय आर्मीने खुलासा केला आहे. त्यांनी यासाठी पत्रक काढले आहे.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ३ जुलै, २०२० रोजी लेह येथील जनरल हॉस्पिटलमध्ये भेट दिली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेल्या सुविधेच्या स्थितीबाबत काही भागात दुर्भावनायुक्त आणि असंतोषजनक आरोप केले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे काही आरोप करण्यात येत आहेत ते दु्र्दैवी आहेत असंही लष्कराने म्हटलं आहे. सशस्त्र बल त्यांच्या कर्मचार्‍यांना सर्वोत्तम शक्य उपचार देतात.  सध्या करोनाचं संकट देशावर आहे. त्यानुसारच लेह येथील सामान्य रुग्णालयात काही बदल करण्यात आले आहेत. एका प्रशिक्षण हॉलचं रुपांतर रुग्णालय विभागात करण्यात आलं आहे. त्यावरुनही जे काही बोललं गेलं त्यापेक्षा मोठी दुर्भाग्याची गोष्ट काय? असंही लष्कराने म्हटलं आहे.गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून या ठिकाणी वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी नेहमी व्हिडीओ ऑडिओ प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या हॉलचं वेगळ्या रुग्ण कक्षेत रुपांतर करण्यात आलं आहे असंही लष्कराने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.

https://twitter.com/adgpi/status/1279338119251161088  

दरम्यान या भेटीवरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमात ज्याप्रमाणे मुन्नाभाई आपण डॉक्टर असल्याचं त्याच्या वडिलांना भासवतो तशाच प्रकारे ही भेट होती असंही म्हटलं गेलं. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातले काही सीनही ट्विट करुन या घटनेशी जोडले गेले. हा सगळा प्रकार जेव्हा भारतीय लष्कराला समजला तेव्हा त्यांनी पत्रक काढून या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच नरेंद्र मोदी यांनी लष्करी जवानांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी जी भेट दिली त्यावर होणारी टीका अत्यंत दुर्दैवी आहे असंही म्हटलं आहे.

Leave a Comment