मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाण्यासाठी वणवण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाण्याचा भीषण दुष्काळ ; पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

   अमरावती जिल्ह्यातील 12 गावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामविकास परिवर्तन योजने अंतर्गत दत्तक घेण्यात आली, यात तिवसा तालुक्यातील 4 गावे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतले,मात्र तालुक्यातील दत्तक शेंदोळा बूजरूक.येथे पिण्याच्या पाण्याचे भीषण वास्तव असून येथे 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून येथे असलेल्या पाण्याच्या दुष्काळा मुळे लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुम्ही निवडणूकीत दंग नका राहू आमची पाण्याची व्यवस्था करा असा टाहो या गावातील महिलांनी फोडला आहे.

   जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरूक हे गाव मुख्यमंत्री दत्तक गाव योजनेत असून ३०००हजार लोकसंख्याचे गाव आहे, मात्र यंदा मार्च महिन्यातच पाण्याची पातळी कमी झाली असल्याने गावातील ग्रामपंचायतच्या ३बोर,७ हातपंप,७सार्वजनिक विहीरी व गावाला नेहमीच पाणी असणारा तलाव पूर्णपणे आटला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण नागरिकांची होत आहे एका गुंड भर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

   या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुष्काळ आहे,या ठिकाणी पूर्वी टँकरने पाणी पुरवठा होत होता मात्र ड्रम भर पाण्यासाठी 70 रुपये रुपये नागरिकांना मोजावा लागत असल्याने गोरगरीब जनतेला पाणी विकत घ्यावे लागत आहे त्यामुळे जीवन जगण्याचा संघर्ष करावा लागत असल्याने पाणी विकत घेण्यासाठी पैसेच नसल्याने पाण्यासाठी दिवसभर संघर्ष करावा लागतो आहे या गावात आता पाण्याचे कुठल्याही प्रकारचा त्रोत राहला नाही.

   या गावात पाण्याचा टॅंकर बंद झाला आहे, या ठिकाणी जनावरांच्या पिण्यासाठी व्यवस्था केलेल्या पाण्याच्या वापर केला जातो त्याठिकानचे पाणी नागरिकांना प्यावे लागते,गावात पाण्याचा भीषण दुष्काळ असल्याने मेळघाट सारखी भीषन पाणी समस्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या शेंदोळा बुजरुक गावात आहे त्यामुळे आता पाण्यासाठी आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराच महिलांनी दिला आहे.

Leave a Comment