एकनाथ खडसे आज बांधणार घड्याळ ; शरद पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 40 वर्षांपासून ज्या नेत्याने महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपचा प्रचार केला, ज्यांनी भाजप वाढवली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाला बळ दिले ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती. खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश का भाजप साठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी प्रवेशासाठी एकनाथ खडसे काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.

गेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. “मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यासोबतच भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook