एकनाथ खडसेंच्या मनात नक्की काय ?? ‘नो कॉमेंट्स’ मुळे भुवया उंचावल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले आहे.खडसे याना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदही मिळणार अशीही माहिती समोर येत होती. घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पक्षांतराबाबत ‘नो कॉमेंट’ असे उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

शुक्रवारी दुपारी एकनाथ खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आले होते. आपल्या निवासस्थानी असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही”. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केल.

यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही खडसेंबद्दल भाष्य करतं म्हटले होते की एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली.तसेच कामानिमित्त भेटीगाठी होत असतात .भेटीगाठी झाल्या म्हणजे काळबेर समजू नये असंही अजित पवार म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment