कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कोकण भागातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणातल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, मुंबईतल्या विभागप्रमुखांमध्येही मोठे बदल करण्यात आले असून कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिमचे विभागप्रमुख कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सुधाकर सुर्वे यांना संधी देण्यात आली आहे.

1 thought on “कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे”

Leave a Comment