देशातील ‘ही’ ११ शहरं वगळून अन्य ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा संपायला अवघे ४ दिवस उरले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. पुढच्या टप्प्यात देशभरात ११ शहरं वगळून अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली जाण्याची विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशातील प्रमुख ११ शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे या शहरांत लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. देशभरातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, इंदूर या शहरांमध्येही कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन शहरांसह देशभरातील या शहरांमध्येही लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही असेल अशी शक्यता आहे. या तीनही शहरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. आणि लॉकडाऊन उठवल्यास कोरोना आणखी पसरण्याचा धोकाही आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीसह ठाणे आणि पुणे या शहरांत लॉकडाऊन आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment