राजकारणात कोणी कोणाला भेटावे यावर बंदी नाही,खडसेंच्या भेटीबाबत शिंदेंचे सूचक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । ‘राजकारणात कोणीही कोणालाही भेटु शकतो. कोणी कोणाला भेटावे, यावर बंदी नाही’ असे विधान राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आले होते. राज्यात भाजपामधील नाराज नेत्यांचे भेटीगाठीतून भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत.

त्यातच नाराज नेत्यांमध्ये सर्वात वर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आहे. पक्षाकडून विधानसभेच्यावेळी खडसेंना मिळालेली वागणूक त्यांच्या नाराजीचा मुख्य कारण मानलं जात आहे. यासगळयात आता खडसे इतर पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. अलीकडेच खडसे यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

तेव्हा भाजपा पक्षात नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या वावडया उठत आहेत. त्याबाबत शिंदे यांना छेडले असता त्यांनी वरील भाष्य केले. पुढे बोलताना शिंदे यांनी,’खडसे हे सर्वांचेच मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केलेले असुन गेल्या अनेक वर्षाचे सर्वांचे स्नेह संबध आहेत. त्यामुळे भेटण्याचा वेगळा अर्थ काढु नका. राजकरणात कुणीही कुठेही जाऊ शकतो, कोणालाही भेटू शकतो’ असे सूचक विधान केले आहे.

Leave a Comment