मोठ्या वादंगानंतर अखेर फेसबुकने ‘त्या’ भाजप नेत्याचे अकाउंट केलं बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतीय जनता पक्षाचे तेलंगणमधील नेते टी. राजा सिंह यांच्या फेसबुक अकाउंटवर कारवाई करत फेसबुकने त्यांचे अकाउंट आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे. टी. राजा सिंह यांनी द्वेष पसरवणे आणि हिंसेला उत्तेजन मिळेल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा ठपका त्यांच्यावर फेसबुकने ठेवला आहे. द्वेष परवणे आणि हिंसेला उत्तेजन देण्याच्या विरोधातील फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही राजा सिंह यांच्यावर आमच्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे, असे मेलद्वारे प्रसिद्ध केलेल्या एका निवदनात फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपचे नेते, आमदार टी. राजा सिंह यांचे अकाउंट फेसबुकवरून काढून टाकण्यात आले आहे, असे प्रवक्त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

म्हणून फेसबुकच्या कारवाई मागे हे कारण
द वॉल स्ट्रिट जर्नल या अमेरिकेतील एका दैनिकाने फेसबुक भारतात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यात टी. राजा सिंह यांच्या अकाउंटवर धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या पोस्टचा दाखल दिला होता. याशिवाय भारतातील फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांच्यावर सध्या गंभीर आरोप करण्यात आले होते. अंखी दास यांनी भाजप नेत्याच्या द्वेष पसरवणे आणि हिंसेला उत्तेजन काही पोस्टवर कारवाई न करण्याचा आरोप द वॉल स्ट्रिट जर्नलच्या लेखात केला होता.

टी. राजा सिंह यांच्यावर फेसबुकची कारवाई

द वॉल स्ट्रिट जर्नलच्या लेखांनंतर फेसबुकच्या भारतातातील पक्षपाती धोरणावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. फेसबुकच्या अंखी दास यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पोस्टद्वारे सत्ताधारी पक्ष भाजपचे समर्थन केले आहे. यानंतर सर्वांचे लक्ष फेसबुककडे वळले. दरम्यान, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत भाजप आणि फेसबुकला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत या प्रकरणाची चोकशीची मागणी केली.

दरम्यान काल बुधवारी फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन आयटी व्यवहार विषयक संसदीय समितीसमोर हजर झाले. काँग्रेस नेते शशी थरूर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या संसदीय समितीने फेसबुकच्या प्रतिनिधींना सुनावणीसाठी बोलवले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी ही सुनावणी घेण्यात आली होती. त्यांनतर भाजपच्या टी. राजा सिंह यांचे अकाउंट फेसबुकवरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आल्याचे दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment