सोनिया गांधींविरोधात FIR दाखल; PM Care Fund वरून चुकीचे आरोप केल्याचा ठपका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बेंगळुरू । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिमोगा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित, तसेच इतर आरोपांविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ११ मे रोजी काँग्रेस पक्षाने खोटे दावे करत केंद्र सरकारवर खोटे आरोप केले गेले, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित काही आरोप केले होते. या आरोपांचा उल्लेख करत हे आरोप चुकीचे असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १५३, ५०५ अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

‘पीएम केअर्स ‘ फंडाबाबत काय म्हणाली होती काँग्रेस
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केअर फंड अंतर्गत जमा होणाऱ्या निधीच्या पारदर्शकतेवर प्रश्न केला होता. या फंड अंतर्गत किती रक्कम जमा झाली आणि किती खर्च केली याबाबत मोदी सरकारने खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसनं केली होती. पंतप्रधान केअर्स फंडाची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणीही सतत काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुद्द्यावर सतत टीका केली जात आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काँग्रेसच्या वतीने पत्रही लिहिले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment