माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक; मुलगी शर्मिष्ठाने ट्विटमधून केली चिंता व्यक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं होतं. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. शर्मिष्ठा यांनी एक आठवण ट्विट करत आपले वडील प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं कि, ‘माझ्या वडिलांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात आल्याने मागील वर्षी ८ ऑगस्ट हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस होता. अगदी एक वर्षानंतर १० ऑगस्टला ते गंभीर आजारी पडले आहेत. देव त्यांच्यासाठी सर्व काही चांगले करु दे आणि मला जीवनातील सुख आणि दु: ख दोघांबाबत समान पद्धतीने स्वीकारण्याची शक्ती दे. त्यांची चिंता व्यक्त करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते.’

दरम्यान, प्रणव मुखर्जी यांना सोमवारी दुपारी  दिल्ली कॅन्टोन्मेंट येथील लष्कराच्या आर अँड आर सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शस्त्रक्रिया होण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सोमवारी, माजी राष्ट्रपतींच्या मेंदूत शस्त्रक्रिया झाली, त्यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी जमली होती. तथापि, अद्याप त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसलेली नाही आणि परिस्थिती नाजूक होत गेली आहे.

डॉक्टरांची विशेष टीम सतत माजी राष्ट्रपतींच्या आरोग्याची काळजी घेत आहे. तत्पूर्वी, प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी ट्वीट केले की कोरोना तपासणीत त्यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे आणि गेल्या आठवड्यात त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी क्वारंटाई व्हावे आणि त्यांनी कोविड-१९ ची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment