‘राम मंदिराचे भूमिपूजन याआधीचं राजीव गांधींच्या हस्ते पार पडलंय’- दिग्विजय सिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आता या मुद्द्यावरून राजकारण तापायला सुरु झाले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन अगोदरच झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, अशी राजीव गांधींचीही इच्छा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांवरुन भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज दिवसभर राम मंदिराच्या भूमिपूजनावरून दिग्विजय सिंह यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर ट्विटवर टीका केली. दिग्विजय सिंह यांनी लागोपाठ केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ”अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आता तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देताय?”. भूमिपूजनासाठी निवडलेल्या अशुभ मुहुर्तामुळेच या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्यांना कोरोना व्हायरसची लागण होतेय असं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं.

”माझी मोदीजींना विनंती आहे, त्यांनी ऑगस्टचा अशुभ मुहुर्त टाळावा, शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माणाचा योग आला आहे, त्यामुळं आपल्या हट्टापायी त्यात विघ्नं पडू देऊ नका,” असे दिग्विजय यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. भगवान राम कोट्यवधी हिंदुंच्या आस्थेचे केंद्र आहे. हजारो वर्षांपासून धर्माच्या स्थापित मान्यतांबरोबर खेळू नका असा दिग्विजय सिंह यांनी सल्ला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment