बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार? ; गिरीश बापट यांनी दिले आश्चर्यकारक उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. त्याच धर्तीवर आज ते मुंबई मध्ये येणार असून योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं होत असतील तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे, असं विधान बापट यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा सवाल बापट यांना करण्यात आला. तेव्हा, योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं झाली तर आनंद व्यक्त करायला हवा, दुःख व्यक्त करण्याचं कारण नाही. योगी आदित्यनाथ यांच उत्तर प्रदेशातलं काम हे अभिनंदनीय आहे, असं बापट म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी मात्र योगीना दिला इशारा

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र योगीना इशारा दिला होता. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं नात दुधात जशी साखर विरघळते, असं नातं आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment