अर्णब गोस्वामी प्रकरणात राज्यपालांची उडी ; गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन करून अर्णबची सुरक्षा आणि आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप शिवसेनेवर टीका करत आहे. अर्णबच्या अटकेवरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत आता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही उडी घेतली आहे. कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आणि अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज फोन केला. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गोस्वामी यांच्या कुटुंबियांना भेटण्याची, तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. राज्यपालांनी यापूर्वीही देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अलिबागवरुन तळोजा कारागृहात आणण्यात आलं. तेव्हा अर्णव यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.  भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राज्यपाल कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केल्याची माहिती मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment