ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे राजकीय हेतू नाही; हसन मुश्रिफांचे अण्णा हजारेंना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याच्या राज्य सरकाराच्या आक्षेप घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफांना पत्र लिहिले होते. या पत्राला आज हसन मुश्रिफांनी पत्राद्वारे उत्तर देत ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे कुठलाही राजकीय हेतू नसून सदर लोकशाही मार्गाने नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं.

ग्रामविकास मंत्री मुश्रिफांनी अण्णा हजारेंना लिहलेल्या पत्रात म्हटलं कि, ७३वी घटनादुरूस्ती, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेता येत नाहीत. याशिवाय कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करूनच कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातील योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला करावा लागला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी हीच अपेक्षा आहे असं मुश्रीफ यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय राज्यातील गावे समृध्द करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. याविषयी लवकरच आपणाशी चर्चा करणार आहे. तसेच, प्रशासकाच्या निर्णयाबाबतही भेटीच्या वेळी सविस्तर माहिती देईन, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी अण्णा हजारेंना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहीले होते. ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, असे परिपत्रक काढून ग्रामविकास विभागाने घटनेची व कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात केला होता. प्रशासक नियुक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उपोषण करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment