कोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ हे त्रिसूत्र वापरणं गरजेचं – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |कोरोना सोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच कोरोना उपचाराबाबत राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. “सध्या आपल्याकडे करोनावर प्रतिबंधक लस नाही. लस येईपर्यंत किती महिने लागतील, सांगता येत नाही. दूरदर्शनवरील ‘करोनाशी दोन हात’ या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

हे वर्ष नफा-नुकसानीचा विचार करायचे नाही. हे वर्ष फक्त जगण्यासाठी आपण जगायला हवं. हे करीत असताना आपल्याला एसएमएस पद्धतीने जगावे लागेल,” असं टोपे म्हणाले.

पाहूया काय आहे ‘एसएमएस’ चा फुल फॉर्म –

एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग,
एम म्हणजे मास्क,
एस म्हणजे सॅनिटायजर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅण्डस्.

राज्य सरकारचा एकच फोकस राहिलेला आहे की सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यासमोर आहे, सामान्य गरीब रुग्ण डोळ्यासमोर आहे आणि त्याचे हित आपल्याला कसं जपता येऊ शकेल ते जपण्याच्या दृष्टीकोनातूनची धोरणं आखण्यात आलेली आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook