शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील? ; अनिल देशमुख म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी काळात शरद पवार कदाचित पुतण्याला नव्हे, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला होता. चंद्रकांत दादांच्या त्या विधाना बद्दल विचारले असता राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख त्याना खरमरती प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची काय? काही कर्तुत्त्व नसताना, उंची नसताना ते हे बोलतात. त्यांनी आपली उंची काय ते आधी पाहावं. हे सर्वांनाच माहिती आहे. ते मोठ्या मोठ्या नेत्यांबाबत असंच काही बोलून आपली उंची वाढवत राहतात, अशी जहरी टीका अनिल देशमुख यांनी केली. तसेच कोरोना आणि विविध आघाड्यांवर आमच्या सरकारने चांगलं काम केलं आहे. हीच आमची अचिव्हमेंट आहे. आमचे सरकार पाच वर्षे चालेल. विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावं, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.

चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी इस्लामपूरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले होतं. आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment