लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन धोरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. लॉकडाउन हेच धोरण ठरवता कसं येईल? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.

ठाकरे सरकारच्या लॉकडाउनच्या धोरणार प्रश्न उपस्थितीत करत फडणवीस म्हणाले कि, ‘मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे,’ असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

याशिवाय राज्यात रॅपिड टेस्टिंग आणि इतर चाचण्यांची संख्या वाढवलं का जात नाही? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच सध्या वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्था यामध्ये ताळमेळ नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं. रुग्णालयांमध्ये आयसीयूचे बेड आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. शासनाने जी खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे ती वेगवान नाही. ती प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे असाही सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment