येथील गुंतवणूक आणि बॉलीवूड दुसरीकडे नेण्यासाठी मुंबईला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का?- शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत हीने मुंबई शहराबाबत आक्षेपार्ह्य विधान केलं. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला चांगले फैलावर घेतले.

नी म्हटले की, आम्ही मुंबईत सर्वांना सामावून घेतो. पण म्हणून कोणी वातावरण खराब करु नये. सरकारवर विश्वास नसेल तर त्या व्यक्तीला येथे राहण्याचा अधिकार नाही. तसेच कंगना राणौतकडे ड्रग्ज माफियांविरोधात पुरावे असतील तर तिने ते केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवावेत. बॉलीवूडमधील काळा पडदा समोर आणावा, असे अनिल परब यांनी म्हटले. तसेच सध्या मुंबईविषयी सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांमागे शहराला बदनाम करण्याचा डाव आहे. या सगळ्यामागे मुंबईत येणारी गुंतवणूक रोखण्याचे षडयंत्र आहे का? बॉलीवूड मुंबईतून दुसरीकडे हलवण्याचा डाव आहे का?, असे अनेक सवाल अनिल परब यांनी उपस्थित केले.

याशिवाय, कंगना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कधी गेली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तो प्रदेश इतका वाईट आहे तर मग भारतात का आणला जातोय? कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपने याचे उत्तर द्यावे, असे अनिल परब यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment