विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राजकरणात कोणीच कोणाचा कायमचा सोबती नसतो यात काहीच दुमत नाही. याचीच प्रचीती येत्या विधानसभा निवडणुकीला बघायला मिळणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघात चुलत्या पुतण्याची लढत महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. नुकतेच शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे राष्ट्रवादीच राहिलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीला लढत होणार आहे.

कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना राबवणे अशक्य : गिरीश महाजन

Untitled design (15)

खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार

बीडच्या राष्ट्रवादीच्या राजकारणाला धनंजय मुंडे यांच्या एक छत्री नेतृत्वाने जखडून टाकले आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व आपल्याच हाती राहिले पाहिजे यासाठी धनंजय मुंडे यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांच्या याच प्रयत्नामुळे रुष्ठ झालेले. सुरेश दस राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले आहेत.

पाण्याप्रमाणे पाकिस्तान सेमी फायनलसाठी देखील भारतावरच अवलंबून

जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात जरा देखील फरक पडला नाही. मात्र अजित पवार यांनी आमच्या पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे असे म्हणून आपल्या जुन्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीत राहूनच आपले राजकारण सुराला लागेल याचा अंदाज ओळखून असलेले जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीवर घरफोडीचा नेहमी आरोप लावला जातो. तो आरोप या देखील निवडणुकीत नव्याने लावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाच्या सरी अंगावर घेत तुकोबाची पालखी ‘लोणी काळभोर’ मुक्कामी

Leave a Comment