ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकलूज प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात शेवटपर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐन वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर खाट मारून भलत्याच नेत्यांना मंत्रीपदे देण्यात आली. अशा सर्व राजकीय स्थितीत जुलै महिन्यात होणाऱ्या राज्यपालांच्या निवडीत विजयसिंह मोहिते पाटील यांना हिंदी भाषिक राज्यात राज्यपाल बनवले जाईल अशी माहिती वारंवार पुढे येत होती. मात्र आज राज्यपालांच्या झालेल्या नेमणुकांवरून त्यांना राज्यपाल पद दिले जाणार नाही हे निश्चित झाले. त्यामुळे विजयसिंहांना काय मिळणार याकडे पुन्हा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्याची भाजपची उमेदवारी देण्यास भाजप आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या जागेसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील अनुकूलता दाखवली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील उद्या माढा विधानसभेचे उमेदवार घोषित झाले तर नवल नबाळगलेले बरेच. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी या वृत्ताचा नेहमीच इन्कार केला आहे. त्यांचा इन्कार हि राजकारणातील खेळीची प्राथमिक पायरी असतेच असते. त्यामुळे येती विधानसभा सोलापूर जिल्हयात नवीन राजकीय समीकरणे घेऊन येणार आहे.

नगरसेविकेच्या मुलीचा जावयानेच केला सपासप वार करून खून

दरम्यान माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे देखील भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना भाजपची उमेदवारी वारसा हक्काने मिळेल आणि पुन्हा मोहिते पाटलांना खो बसेल. परंतु रणजित शिंदे भाजप मध्ये आलेच नाहीत तर मात्र त्यांच्या जागी विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. सध्याची राजकीय स्थिती बघता विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून सहज विजयी होतील अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. विजयसिंहांचे विजयाचे पारडे जड असल्यानेच रणजित शिंदे भाजपात येऊ पाहत आहेत असे देखील बोलले जाते आहे.

हे पण वाचा –

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Leave a Comment