लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
ऑटो रिक्षाचे हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील १९ हजार रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा जगण्याचा प्रश्न गंभीरबनला आहे.

महेश मस्के कोल्हापूरातील रिक्षा चालकांपैकी एक. कोल्हापूर शहरा लगत असणाऱ्या राजेंद्र नगर परिसरात ते राहतात. यांचा रोजचा दिनक्रम असतो तो म्हणजे सकाळी डबा घ्यायचा आणि घरातून रिक्षा घेवून बाहेर पडायचं. कधी दिवसभर तर कधी रात्रभर रिक्षा चालवायची. दिवसाकाठी पाच सहाशे रुपयेचा धंदा करायचा आणि घरी माघारी फिरायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा. मात्र गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असणाऱ्या लॉक डाऊन मुळे त्याची ही रिक्षा घराच्या दारातच उभी करावी लागली आहे. नुसती उभी नाही तर रिक्षाला त्यांनी झाकून ठेवलं आहे. कोरोना संकटात संचारबंदी लागू केल्याने रिक्षाचं चाक न फिरल्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा हे आता थांबला आहे.

Untitled design - 2020-04-17T155016.743त्यामुळे घराचे आर्थिक मीटरचा जणू काही डाऊन झाले आहे. यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मस्के यांचं कुटुंब संचार म्हणजे काळात परगावी अडकल्यामुळे हे खुद्द स्वतःलाच घरात जेवण करतात तर एक वेळेचा जेवण बाहेरून डबा आणतात. दिवभर कंटाळा घळवण्यासाठी ते आपल्या जवळच्या रिक्षा चालकांना घरी बोलावून गप्पा ही मारतात. सोबत चहाही घेतात. मात्र आता बाहेरचे पैसे द्यायला त्यांच्याकडं पैशाची चणचण जाणवू लागली आहे.

मस्के याचं अख्ख कुटुंब रिक्षा धंद्या वरती अवलंबून आहे. त्याच रिक्षासाठी काढलेलं कर्ज, कौटुंबिक कारणासाठी काढलेलं कर्ज, दवाखान्याचा खर्च , मुलाबाळांचे शिक्षण असे एक ना अनेक प्रश्न आता रिक्षाचालकांचा समोर उभे राहिले आहेत. सरकारने रिक्षाचालकांच्या समस्यांच्या कडन पाहणं गरजेचे आहे अन्यथा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णतः थांबलाय. त्यामुळे महिनाभराचे घरभाडे,धान्य, गॅस सिलेंडर, दुधासह जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे .या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment