‘हे’ आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय आज घेण्यात आले. शेती, दुग्धविकास, मासेमारी, नगरविकास, सार्वजनिक वाहतूक आणि परिवहन, लॉकडाऊनचे निर्बंध कमी करणे याबाबत काही निर्णय आज घेण्यात आले.

वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक आणि मालवाहतुक गाड्यांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर काळापर्यंत करमाफी मिळणार आहे. राज्यातील मच्छीमारांना अनुदान देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय अतिरिक्त येणारं १० लाख लिटर दुध रूपांतरण प्रक्रियेसाठी  वापरण्याची मुदत ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. शहरातील आरोग्य सुविधा सक्षम होण्यासाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नाशिकमधील नवीन कृषी विज्ञान संकुल निर्मितीस आज मान्यता देण्यात आली. तर मुंबई महापालिका वगळता येणाऱ्या ८ महापालिका आणि ७ नगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अमंलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

याशिवाय राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय अनलॉकमधील शिथिल करण्यात आलेले निर्बंध त्याच पद्धतीने चालू ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com