सुशांत सिंह प्रकरणाचा तपास CBIकडे जाताच राज्यात हालचालींना वेग; गृहमंत्र्यांची महत्वाची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रालयात एक महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, विधि व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करायची की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या राज्याचे महाधिवक्त्या गृहमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. मंत्रालयात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात महत्वाची बैठक सुरू आहे.

याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडली आहे. सुशांत सिंग प्रकरणी बैठक झाल्याचं सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment