जळगाव : भाजपच्या अडचणीत वाढ ; स्मिता वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या आमदार  स्मिता पाटील यांना उमेदवारी देवून  त्यांची उमेदवारी माघारी घेतल्याने त्या पक्षावर नाराज  असल्याचे बोलले जात  आहे. अशातच  त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतल्याने जळगावच्या राजकारणात सस्पेन्स वाढला  आहे.

स्मिता वाघ  आणि  त्यांचे पती  उदय वाघ  यांनी राष्ट्रवादीचे  उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतली  आहे. या तीन नेत्यांमध्ये बंद दराआड नेमकी काय चर्चा झाली. या बाबत कोणताही तपशील अद्याप उघड  झाला  नाही. मात्र या भेटीने चर्चेला चांगलेच तोंड फुटले आहे.

उन्मेष पाटील यांचा  उमेदवारी अर्ज  भरल्यापासून वाघ  पतीपत्नी त्यांच्या प्रचाराला  गैरहजर  होते. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलटचर्चा रंगू लागल्या होत्या अशातच या दोघांनी गुलाबराव देवकर यांची  भेट घेतल्याने भाजपच्या अडचणीत चांगलीच वाढ  झाली आहे. उदय  वाघ हे  जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत. तर स्मिता वाघ या भाजपकडून विधान परिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे  भाजपची  महत्वाची  पडेसांभाळणाऱ्या या  दाम्पत्याच्या भुमिकेकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले!

‘म्हणून’ माझ्या वाट्याला वनवास – एकनाथ खडसे

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

Leave a Comment