विधानपरिषद उपसभापती निवडणूक: भाजपने उमेदवार रिंगणात उतरावल्याने चुरस वाढली

मुंबई । उद्या मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरावल्याने चुरस वाढली आहे. भाजपने भाई गिरकर यांना उमेदवारी देत त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपने विधानपरिषदेतल्या आपल्या सर्व आमदारांना भाजपने मुंबईमध्ये बोलावलं आहे. काही आमदार हे आज अनुपस्थित होते. तर भाजपच्या दोन आमदारांना कोरोना झाल्यामुळे त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप सभापतींना करणार आहे. दुसरीकडे या निवडणुकीत दुसरे उमेदवार शिक्षक आमदार कपिल पाटील यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा होती, पण भाजपने स्वत:चाच उमेदवार रिंगणात उतरवला. मतविभागणी करत उपसभापती निवडणुकीत विजयासाठी भाजपचा प्रयत्न आहे.

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठीचं संख्याबळ

काँग्रेस- ८

महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय.

भाजप- २२

शेकाप- १

रासप- १

लोकभारती- १

अपक्ष- ४

भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook