राहुल गांधी त्या परिसरातील, त्यांनी काहीच कारवाई का केली नाही? हत्तीणीच्या हत्या प्रकरणावर मनेका गांधींचा सवाल 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । केरळच्या मलप्पुरम भागात एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून ते खायला दिल्याची घटना घडली आहे. ही हत्तिणी या अननस मुले मृत्युमुखी पडली. यानंतर या घटनेचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी असे कृत्य करणारे किती क्रूर आहेत अशाप्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या कर्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मनेका गांधी याही या प्रकरणावर बोलल्या आहेत. त्यांनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष या भागातलेच आहेत, त्यांनी या प्रकरणावर कोणतीच कारवाई का केली नाही असा प्रश्न केला आहे. 

त्या म्हणाल्या,” आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये कारवाई करत असतो मग या जिल्ह्यात का कारवाई केली जात नाही. तुमच्या तोंडात कुणी तुमच्या पोटात बाळ असताना असा दारुगोळा घातल्याची कल्पना तुम्ही करू शकता का? तेथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्या वन्य सचिवाला काढून टाकले पाहिजे. तेथील मंत्र्यांना जर काही वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राहुल गांधी तिथले आहेत, मंत्री तिथले आहेत त्यांनी कोणतीच कारवाई का केली नाही?” असे संतप्तरित्या त्या म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी हा खून आहे आणि मलप्पुरम मध्ये नेहमी अशा घटना होत राहतात असा आरोप केला आहे. ३००-४०० पक्षी एकाच वेळेत मरावेत म्हणून त्यांनी रस्त्यावर विष टाकले होते. हा सर्वात हिंसक जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. 

त्यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत असताना केरळ सरकार घाबरले असल्याची टीका केली आहे. केरळ सरकार कोणतीच कारवाई करत नाही आहे, ते घाबरले आहेत असे वाटते आहे. दर तीन दिवसानी तिथे एक हत्ती मारला जातो असा आरोप त्यांनी केला आहे. याबरोबर त्यांनी आपल्याकडे २० हजारांपेक्षाही कमी हत्ती उरले असून तेही झपाट्याने कमी होत असल्याचे सांगितले. आहे. दरम्यान फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ल्यानंतर मनुष्यवस्तीला कोणतीही इजा न करता ही हत्तिणी पाण्याच्या शोधात वेल्ल्यार नदीमध्ये गेली होती. तिथेच ती मृत झाली होती. 

 

Leave a Comment