राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना पक्षाध्यक्ष करा! आठवलेंचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पक्षांतर्गत बऱ्याचं घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ नेत्या आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेता निवडणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यावरुन काँग्रेस पक्षातील दोन गटांमध्येच मतभेद पहायला मिळाले. या सर्व घडामोडींवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक सल्ला दिला आहे.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन त्यांनाच काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद स्विकारण्यास राहुल आणि सोनिया गांधी दोघेही तयार नसल्यामुळे ही सूचना करत असल्याचं आठवलेंनी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या, ज्यावरुन मोठं वादळ निर्माण झालं होतं. सध्याच्या घडीला पुढील सहा महिने सोनिया गांधीच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहणार असून यानंतर निवडणुका घेतल्या जाणार असल्याचा निर्णय कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment