शरद पवारांबद्दलचे गोपीचंद यांचे ‘ते’ विधान चुकीचं; भाजप त्यांच्याशी सहमत नाही- आ. अतुल भातखळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकरांच्या या टीकेनंतर एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, भापजने पडळकरांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. शरद पवारांवर पडळकरांनी केलल्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेलं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. अतुल भातखळकर म्हणाले कि, ”शरद पवार यांच्याशी आमचे राजकीय मतभेद आहेत. त्यांच्या धोरणांशी आमचे मतभेद आहेत. मात्र गोपीचंद यांचे त्यांच्याबद्दलचे विधान अत्यंत चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टी या विधानाशी असहमत आहे.”

काय म्हणाले होते पडळकर?

आमदार पडळकर हे आज पंढरपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले ,“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कसलीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही. त्यामुळे धनगर समाज केवळ राजकारणासाठी पवाराना लागतो. तसेच विधानसभा निवडणुकीनंतरचा नाशिक येथील अवकाळी पाऊस असो किंवा कोकणात वादळी वाऱ्याने झालेले नुकसान असो. या दोन्ही प्रसंगात शरद पवार पाहणी दौऱ्याला गेले. पण त्या ठिकाणच्या लोकांना दमडीचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित आहे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment