प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये होणार शिफ्ट; दिल्लीतील घर खाली करण्याची केंद्राने दिली होती नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीमधील लोधी इस्टेट मधील सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्राने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी नोटीस पाठवली आहे. ही मिळाल्यानंतर प्रियंका गांधी आता नवीन राजकीय हालचाली करण्याच्या विचारात आहेत. प्रियंकाच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होतील. त्या लखनऊमधील बंगल्यात राहतील. उत्तर प्रदेश राज्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रियंका आता लखनऊमध्ये राहण्याबाबत तयारी करत आहेत.

प्रियांका गांधी लखनऊमधील ‘कौल हाऊस’ मध्ये शिफ्ट होतील, अशी अपेक्षा आहे. हा बंगला इंदिरा गांधी यांची मावशी शीला कौल यांचा आहे. शीला कौल केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री देखील होत्या आणि काँग्रेसच्या त्या लोकप्रिय नेत्या होत्या. दरम्यान, लखनऊमधील ‘कौल हाऊस’ च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.प्रियंका गांधी यांचा दिल्ली ते लखनऊ हा प्रवास महत्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीपूर्वी लखनऊमध्ये राहून त्यांना उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. यामुळे त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, प्रियंका गांधी यांना दिल्लीतील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका गांधी यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. ६-बी-हाऊस नंबर- ३५ लोधी एस्टेटमध्ये प्रियंका गांधी या त्यांच्या कुटुंबासोबत सध्या राहत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment