मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थिल्लरपणा शोभत नाही अशी जहरी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला. असे शब्द वापरणे चुकीचं आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा आवज दाबण्यासाठी जलयुक्त शिवार चौकशी असं कोणी सांगितलं? कॅगने काही तपास केला. फडणवीस यांनी भ्रष्टाचार केला असं कोणीही म्हटलं नाही. त्यांनी अंगाला लावून घेऊ नये, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. भाजपने चिंता करु नये, त्यांनी काही केलं नाही तर घाबरु नये. कॅग रिपोर्ट आला म्हणून चौकशी असं त्यांनी नमूद केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये. पंतप्रधान मोदी देशावर संकट आलं तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतःची तुलना करु नका. आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करतं ते महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा करावी. केंद्र सरकार मदत करेल. मात्र राज्य संकटात असताना आणि संकटं जाणून घेत असताना अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment