शिवसेना नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल अजित पवारांचा खुलासा, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पारनेर नगर पंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी नाट्य असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पाचही नगरसेवकांनी घरवापसी केली. या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनी प्रथमच खुलासा केला आहे. ‘निलेश लंके यांनी काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं असं म्हटलं म्हणून मी त्यांच्या गळ्यात केवळ रुमाल टाकले. मग मला नंतर कळालं की, ते शिवसेनेचे होते, ‘ असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. सारथी संस्थेच्या वादावरून बोलावलेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

यावेळी अजित पवार यांना शिवसेनेच्या ५ नगरसेवकांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “”मी त्या दिवशी बारामतीत होतो. त्या दिवशी गर्दीत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो की, काळजी घ्या. त्या गर्दीत काही वाहनं आली. तिथे नीलेश लंके तिथे आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे. त्यावर लंके मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात रुमाल टाकले आणि त्यानंतर कार्यक्रम झाला. मग मला नंतर कळालं की, ते शिवसेनेचे होते. मग ती त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, दादा ते भाजपात जाणार होते. त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादीनं घेतलं नाही, तर भाजपात जाणार. आम्ही माणसांची फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी नीलेश लंके यांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं.

“त्यानंतर त्या नगरसेवकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पाठवलं. तुमच्यावर काही अन्याय झाला असेल, वा म्हणण असेल तर तुमचे प्रश्न वरिष्ठ सोडवतील, असं त्यांना सांगितलं. या बाबतीत कधीही मुख्यमंत्री नाराज नव्हते. ते मला कधीही ते बोलले नाहीत. माध्यमांनीच ते नाराज असल्याचं दाखवलं,” असं अजित पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment