राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बार्शी प्रतिनिधी |राष्ट्रवादीच्या काळात राज्याचे पाणी पुरवठा आणि मल्य निस्सारण मंत्री राहिलेले आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला सोशल मीडियात उत आला आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी सुरु केल्याने राजेद्र राऊत यांच्या चिंतेत मात्र चांगलीच वाढ झाली आहे.

सेना भाजप युती झाली तर बर्शीची जागा शिवसेनेला सुटणार आहे. तर शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या राजेंद्र राऊत यांना भाजप कडून तिकीट मिळण्याची आस आहे. त्यामुळे सोलपशिवसेनेत गेल्यास विद्यमान आमदार दिलीप सोपल असल्याने त्यांना शिवसेनेच्या कोठ्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.तसेच दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी सोडल्यास राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे. मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील मोठा कळप भाजपात नेह्ल्याने राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. अशात १ आमदारच पक्ष सोडून जात असेल तरही राष्ट्रवादीची मोठी हानी असणार आहे.

१९८५ साली तत्कालीन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप सोपल यांनी बार्शी विधान सभेचे मैदान मारले. त्यानंतर त्यांनी मागे वळूचं पहिले नाही. १९८५ ते २००४ सलग १९ वर्षे ते विधान सभेचे सदस्य राहिले. त्यानंतर त्यांचा शिवसेनेच्या राजेंद्र राऊत यांनी २००४ च्या निवडणुकीत पराभव केला. मात्र २००९च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून दिलीप सोपल यांनी पुन्हा मैदान राखलं. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांच्या बाजूने अनिश्चित परिस्थिती असताना त्यांनी राजेंद्र राऊत यांचा पराभव केला. आता सुद्धा ते पराभवाच्या छायेत असल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी सुरु केली आहे.

Leave a Comment